बातमी

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

(सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम)

वर्तमान युग ही स्पर्धा परीक्षेची युग आहे. आणि प्रत्येक पालक आपला पाल्य हा या स्पर्धेच्या युगामध्ये असा समोर गेला पाहिजे याकरिता सातत्याने प्रयत्नशील असतो या निमित्तानेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025 च्या वतीने स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, व दहावी बारावी नंतर Net,Jee,cet ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन त्रिशरण चौक बुलढाणा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरास मार्गदर्शक म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मोनिका साळवे डीवायएसपी सीआरपीएफ, जेई नीट सीईटी या परीक्षेच्या मार्गदर्शनाखासाठी अरविंद पवार सर हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025 च्यावतीने समितीचे अध्यक्ष निलेश राऊत कार्याध्यक्ष डॉ. अर्चित हेरोळे सचिव दीपक मोरे कोषाध्यक्ष अमोल वाठोरे व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button