बातमी

व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीचे साथीदार व्हा : आमदार सिद्धार्थ खरात

वर्दडी बू येथे भव्य बुद्ध विहार व बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उद्घाटन

सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे वर्दडी खुर्द येथे गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून भव्य विश्वशांती बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वास नेले व या विहारात मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, या देशात राजकीय सामाजिक आर्थिक न्याय देत सर्वांना समान संधी व समाजात समाजामध्ये समतेची भावना निर्माण जेव्हा होईल तेव्हा स्वातंत्र्य इथे प्रस्थापित होईल चार ते पाच टक्के लोकांकडे आर्थिक संपत्ती असून या देशातील सर्वांना समान आर्थिक न्याय जोपर्यंत मिळत नाही त्यासाठी धर्माच्या जातीच्या कारणावरून जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम ईथल्या समाज व्यवस्थेमध्ये होत असून हा त्या जातीचा तो आमचा अशा निच विचाराला मुठमाती देऊन नवे रणसिंग फुंकून नव्या विचाराची माणसे ऐक एक करून जोडणार असून जातीभेद , उच्चनीचता , आर्थिक समानतेचे अडसर याला दूर करून शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांची माणसं एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून मी करणार असून या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात सामिल व्हावे असे भावनिक आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी वर्दडी खुर्द येथील बुद्ध विहार व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन समारंभ प्रसंगी केले, ते पुढे बोलतांना म्हणाले की पैशाने माणसे मोठे होत नाहीत या महामानवाच्या विचारांची माणसे एकत्र येऊन सामाजिक संघटन करुन एकत्रित काम केल्यास ती माणस मोठे होतात. यापुढे

केवळ टक्केवारी, कमीशन बाजी, गद्दारी याला सुरुंग लावणार असून स्वतःच्या विकासाबरोबर देशाचा आणि गावाचा व समाजाचा विकास साधा चांगल्या माणसाच्या सानिध्यात रहा व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या एकेक माणसांना जोडून त्या तरुणांना सोबत घेऊन व्यवस्था परिवर्तनाची चळवळ उभी करणार असल्याचा ठाम विश्वास आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला. यावेळी
माजी आमदार तोतारामजी कायंदे, मेहकर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, किशोरभाऊ गारोळे,से नि प्राचार्य पंडित सानप सर, पंडितरावजी खंदारे , माजी सभापती आण्णा खरात, आर एम गवई , भाई दिलीपजी खरात, से नि प्राचार्य डी एस मोरे सर, प्रा. बी ए खरात सर, से नि प्राचार्य आर के मोरे सर, प्रा. डॉ. डी आर इंगळे सर,संघपाल पनाड, जी एस देशमुख , लोकजागरचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते, उत्कर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, से. नि .प्राचार्य डोंगरे सर, प्राचार्य आर एस मोरे, अनंत जुमडे, सरपंच विकास आंधळे, राहुल मोरे,गुलशेरखां पठाण, सरपंच राजू कुहिटे, पत्रकार रामदास कहाळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी विश्वशांती बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी भीमराज ग्रुप यांच्या वर्दडी खुर्द येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले
अत्यंत मंगलमय वातावरनात कार्यक्रम संपन्न झाला

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button