बातमी
व्यापाऱ्यांना हवे महामंडळ व सेवानिवृत्ती वेतन ! * आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यावा; मुख्यमंत्र्यांकडे जितेंद्र जैन यांची मागणी

व्यापाऱ्यांना हवे महामंडळ व सेवानिवृत्ती वेतन !
* आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यावा; मुख्यमंत्र्यांकडे जितेंद्र जैन यांची मागणी
बुलडाणा
व्यापाऱ्यांच्या हिताच्या
दृष्टीने महामंडळाची स्थापना करून सेवानिवृत्ती वेतन देण्याचा निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी पत्राद्वारे केली.
राज्यात लाडकी बहीण योजना राबवली जात असून वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ सुद्धा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून निर्णय न घेता केंद्र व राज्य सरकारकडून सर्व घटकाला समान न्याय मिळणे अपेक्षित असते.
विविध प्रकारच्या करांच्या माध्यमातून शासनाला मिळणाऱ्या
उत्पन्नातून समाजासाठी विविध योजना राबवल्या जातात. कर, महसूल व इतर प्रकारचे उत्पन्न मिळवून देण्यात मोठा वाटा असणारे व्यापारी कायम नजरेआड असतात. शासनाच्या उत्पन्नामध्ये भर घालणारा व्यापारी, करदाता यांच्यासाठी कोणतीच योजना राबवली जात नाही. वेगवेगळ्या जाती-धर्मांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या महामंडळांच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांसाठी देखील शासनाने महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी जैन यांनी केली आहे. अडचणीच्या काळात व्यापाऱ्यांसाठी ते मदतीचे ठरेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.



