शासनकरती जमात होऊन सामाज सेवा करा- जिल्हा संपर्क प्रमुख रिपाइं बाबासाहेब जाधव

शासनकरती जमात होऊन सामाज सेवा करा- जिल्हा संपर्क प्रमुख रिपाइं बाबासाहेब जाधव
मलकापूर,(प्रतिनिधी )- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जिल्हा मेळावा व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार दिन दुबळ्यांचे ह्रदय सम्राट डॅा. रामदासजी आठवले यांचा २५ डिसेंबर वाढदिवस ” संघर्ष दिन “ म्हणून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार होते तर प्रमुख मार्गदर्शक बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव होते.
सर्वप्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखेडे, खामगाव तालुकाध्यक्ष जेष्ठ नेते निळकंठ सोनोने, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष संतोष वानखडे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले, समाजभूषण शाहीर डि.आर. इंगळे यांनी ” भीम माझा कोन होता “ हे गीत गाऊन मेळाव्याचे वातावरण आनंदी केले व मार्गदर्शन केले. मुख्यमार्गदर्शक बाबासाहेब जाधव यांनी मेळाव्याला संबोधीत करतांना म्हणाले की, जो पर्यंत आपण शासनात जात नाही तो पर्यंत आपण प्रशासनाकडून समाजाला न्याय देवू शकत नाही म्हणून डॅा.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की “ शासन कर्ती जमात बना “ हे ब्रिद वाक्य घेवून आमचे नेते दिन दुळ्याचे ह्रदय सम्राट डॅा. रामदासजी आठवले ह्यांनी शासनात जाऊन समाजाची सेवा त्यांच्या परिने करित आहे व समाजाला न्याय देत आहे म्हणून आपण नगरपालीका, महानगर पालीका, ग्रामपंचाती, जिल्हा परिषदा,स्थानिक स्वराज्यासंस्था मध्ये जाऊनच आपण सामाजाला न्याय देवू शकतो. आपण फक्त आपसात भांडत आहात एकमेकांचे उने दुने काढण्यात व मोर्चे आंदोलने करण्यातच दिवस घालवत आहात तर हे केल्या पेक्षा आपण शासनात कसे जाऊ हा विचार समोर ठेवून शासनात जावे तेव्हाच आपण समाजाला न्याय देवू शकतो. रिपाईला सत्तेत जावयाचे असल्यास गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता तयार करा व सत्तेत जा हा मोलीक विचार बाबासाहेब जाधव यांनी मेळाव्याला मुख्यमार्गदन करतांना केला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून बोलतांना भाऊसाहेब सरदार म्हणाले की, सर्वांनी आपआपले आपसातील हेवेदावे विसरून शासनात कसे जाऊ याचा संघटित होऊन विचार करावा पक्षाची बांधणी करावी व डॅा. रामदासजी आठवले यांचे विचार तळागळापर्यंत पोहचावे व मजबूत करावा असे आव्हाण केले.
केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री डॅा. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने संघर्ष दिन साजरा करून मलकापूर येथील सामान्य रूगणालयात फळे वाटप करण्यात आले व गरीब होतकरू यांना कपडे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा युवा नेते मंगेश मेढे, मलकापूर तालुका अध्यक्ष दिलीप इंगळे, नांदूरा तालुका अध्यक्ष शैलेश भाऊ वाकोडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष संतोष भाऊ वानखेडे, खामगाव तालुका शेगाव तालुका अध्यक्ष सुरज भाऊ शेगोकार, संग्रामपूर तालुका अध्यक्ष बाबूलाल इंगळे, जय मोरे, संतोष झनके,इल्यास भाई, मुक्तार खॅा पठाण, अरूण जाहगीरदार, सुनिल अहिरे, जनार्धन झनके, सागर झनके, रमेश तायडे, बाबुराव निकम, कडू झनके, तुळशीराम गरूडे, कुमबाई तायडे इत्यादी असंख्य रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते व डॅा. रामदासजी आठवलेंवर प्रेम करणारे उपस्थितत होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयपाल मोरे तर आभार प्रदर्शन दिलीप इंगळे यांनी केले राष्ट्रगितानी मेळाव्याची सागता झाली.



