बातमी

शिवसाईचे आजचे बाल वैज्ञानिक भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करतील. श्री दिनकर चिंचोले सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बुलढाणा*

शिवसाई युनिव्हर्सल स्कुल बुलढाणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा*

*शिवसाई युनिव्हर्सल स्कुल बुलढाणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा*

*शिवसाईचे आजचे बाल वैज्ञानिक भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करतील. श्री दिनकर चिंचोले सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बुलढाणा*

भारत देशाचे थोर वैज्ञानिक नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी शोधाचे सादरीकरण केलेल्या रामन इफेक्ट चे औचित्य साधुन 1987 पासून 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात भारत देशामधे साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधुन शिवसाई शाळेचे विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळावा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणुन दरवर्षी आपली शाळा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

 


आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसाई युनिव्हर्सल स्कुल बुलढाणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस निमीत्त शिवसाई ज्ञानपीठ तुळशी नगर बुलढाणा व युनिव्हर्सल स्कुल कोलवड येथील दोन शाळांची आंतरशालेय विज्ञान स्पर्धा आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. डी.एच.चिंचोले सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बुलढाणा उपस्थित होते, तर अध्यक्ष स्थानी शिवसाई परिवाराचे संस्थापक श्री डी. एस.लहाने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून श्रीराम पवार, डॉ.यशवंत पाटील, प्राचार्य. राजेश जाधव, डॉ.मनोज व्यवहारे, सुधाकर साखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की डी एस लहाने यांनी शिवसाई शाळेचे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष होऊ पाहतोय आणि याचीच प्रचिती म्हणून शिवसाईच्या चार शाखा मिळून दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. आणि निश्चितच आजच्या सहभागी बाल वैज्ञानिक उद्याचे थोर वैज्ञानिक घडतील यात शंका नाही.विज्ञान प्रदर्शन मधे सहभागी प्रथम गृप वर्ग नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी च्या विद्यार्थांनी व द्वितीय गृप वर्ग 1 ते पाचवी व तृतीय गृप वर्ग 6 वी ते 9 वी च्या वर्ग स्तरावर सहभागी 753 विविध वैज्ञानिक उपकरणे, प्रयोग, सादर करण्यात आले होते. पैकी प्रत्येक वर्गातून 3 नंबर विजेते निवडले गेले होते त्यापैकी आज 105 स्पर्धक सहभागी झाले होते त्यामधून तीन गृप मधून विजेत्या विद्यार्थ्यांना गोल्ड, ब्राँझ, व सिल्वर मेडल व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले. तसेच मागिल 15 दिवसापूर्वी आयोजित केलेल्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आजच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये. सांघिक खो खो, मॅटवर कब्बडी, टग ऑफ वार, रनिग, ई. खेळ घेण्यात आले होते त्यामधून विजेत्या संघाना ट्रॉफी,मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एस लहाने यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले व असेच प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थी अष्टपैलू भूमिका साकारतील व आपल्या शाळेचे तसेच आपल्या राज्याचे नावलौकिक वाढवतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्ग 8 वी चे विद्यार्थी दिया बारवाल, समृद्धी पवार यांनी केले तर स्टेज ची जबाबदारी अंकिता भालेराव निकिता भालेराव, काव्या भारंबे, हर्षदा काळुसे यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी. डी बी मोहरकर, गोपाल आडवे, सागर उबाळे, अर्चना हिवाळे व सर्व शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी व आदरणीय पालक वर्ग यांची मोलाची साथ लाभली व दिलेली कामगिरी व्यवस्थित बजावली व राष्ट्रीय विज्ञान दिन तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button