शिवसाई च्या तीन खेळाडूची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

शिवसाई च्या तीन खेळाडूची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात शालेय स्पर्धेचे आयोजन सुरू आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे यांच्या द्वारा आयोजित शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेचे आयोजन अमरावती या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय स्पर्धेत वयोगट अंडर 17 मध्ये मानव गणेश जाधव याने सुवर्णपदक संपादन केले तर अंडर 19 मध्ये विहीर नितीन अपार याने देखील सुवर्णपदक प्राप्त केले शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
वयोगट 17 वर्षे व 19 वर्षे दोन्ही गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा गुजरात घटक राज्यात नाटियाड या ठिकाणी 9 डिसेंबर पासून आयोजित होत आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंची प्रशिक्षण अमरावती या ठिकाणी सुरू आहे दोन्ही खेळाडू आपल्या प्रशिक्षणासाठी अमरावती या ठिकाणी दाखल झाले आहे. त्यासोबतच नुकत्याच 14 वर्षातील विदर्भ राज्याचा संघ देखील जाहीर झाला आहे या संघात देखील शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलचा ऋषिकेश टेकाळे याची 14 वर्षातील मुलांच्या खो-खो संघात निवड झाली आहे. यांच्या राष्ट्रीय स्पर्धा ह्या बेंगलोर या ठिकाणी दिनांक 11 तारखेपासून संपन्न होणार आहे. ऋषिकेश देखील आपल्या प्रशिक्षणासाठी चंद्रपूर या ठिकाणी रवाना झाला आहे. या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल जुनियर कॉलेज चे संचालक डी एस लहाने सर व प्राचार्य प्रमोद मोहरकर सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टि ए सोर सर यांनी ऋषिकेश ला स्पर्धेसाठी एक भेटवस्तू देऊन ऋषिकेश चे अभिनंदन केले. या सर्व खेळाडू सोबत बोलताना आपण आपल्या राज्याला सुवर्णपदक प्राप्त करून द्याल अशी आशा व्यक्त केली. खेळाडूंनी आपल्या यशाचे आई वडील क्रीडा शिक्षक उबाळे सर व प्रशिक्षक चंद्रकांत इलक सर यांना दिले.



