शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजच्या मिहीर अपार ठरला 2 लाखा क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी

शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजच्या मिहीर अपार ठरला 2 लाखा क्रीडा शिष्यवृत्तीचा मानकरी
बुलडाणा- येथील विहीर नितीन अपार याला राज्य शासनातर्फे क्रीडा शिष्यवृत्ती नुकतीच प्राप्त झाली आहे. मिहीर हा शिवसाई युनिव्हर्सल जुनियर कॉलेज बुलढाणा. वर्ग बारावी विज्ञान शाखेत शिकत असून गत 6 वर्षापासून आर्चरी या खेळाचा सराव करत आहे. मिहिर याने 2024 या वर्षात शालेय राज्यस्तर शालेय राष्ट्रीय स्तर व खेलो इंडिया युद्ध गेम या संपूर्ण स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मिहीर ने शालेय राष्ट्रीय स्पर्धा गुजरात या ठिकाणी सुवर्णपदक प्राप्त केले. तर तामिळनाडू राज्यात झालेल्या चेन्नई या ठिकाणी खेलो इंडिया स्पर्धेत ब्रांच पदक प्राप्त केले आहे . मिहिला नुकतीच 2 लाख रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. मिहीर या सगळ्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व आपले क्रीडा प्रशिक्षक चंद्रकांत इलक सर, उबाळे सर यांना देतो. तर शिवसाई युनिव्हर्सल कॉलेजचे संचालक डी एस लहाने सर, प्राचार्य मोहरकर सर व दाभाडकर सरांनी देखील मिहिर चे मन भरून कौतुक केले आहे.



