बातमी

शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात यांनी केला पेनटाकळी कालव्याच्याचा कार्यारंभ !!

शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात यांनी केला पेनटाकळी कालव्याच्याचा कार्यारंभ !!

मेहकर:

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिध्दार्थ खरात यांनी आज मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांची रामधेनू असलेली पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याबाबत असलेल्या समस्येवर उपाययोजना जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानुसार आज मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेनटाकळी लघु मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातुन पाझरणाऱ्या पाण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळत नसल्याबाबत आमदार सिध्दार्थ खरात यांचेकडे मागणी केली. त्यानुसार आमदार महोदयांनी तात्काळ पेनटाकळी प्रकल्पाचे संबंधित कार्यकारी अभियंता व इतर अधिका-यांसमवेत चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली.
शेतक-यांची शेतीसाठी पाणि सोडण्याची मागणी वाढल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले आर सी सी ट्रफ चे बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार आज दिनांक ५/११/२४ रोजी पेनटाकळी सिंचन प्रकल्पाचे ० ते ११ कि.मी. आर सी सी ट्रफ चे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्याचा कार्यारंभ आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते आज करण्यात आला .
यामुळे ० ते ११ कि. मी मध्ये शेतक-यांच्या जमिनी चिबडल्यामुळे शेतीचे होणारे नुकसान आता होणार नाही. तसेच ११ कि. मी. पुढील शेतक-यांना पाण्याचा अपव्यय न होता पाणि मिळणार आहे.
0 ते ११ कि.मी.कालवा दुरुस्ती चा कंत्राट अंदाजे ७२ कोटी रु चा असून माणिक इन्फ्रास्ट्रक्चर ,छत्रपती संभाजीनगर हे करणार आहेत.
कालव्यातील कचरा साफ करणे, झाडे, झुडपे तोडणे व ११ कि.मी.पुढील कालव्याची छोटी मोठी कामे सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. एकंदरीत ११ कि.मी.पर्यतच्या कामाकरिता कंत्राटदाराला १८ महिण्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी असला तरी हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना आमदार खरात यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.
बैठकीला निंबा भाऊ पांडव , तालुका अध्यक्ष मेहकर, श्री संजय वडतकर जिल्हा परिषद सदस्य, भास्करराव काळे , प्रदेश उपाध्यक्ष , राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष, ॲड. अनंत वानखेडे , ॲड आकाश घोडे, ॲड संदीप गवई , परमेश्वर वानखेडे , सरपंच पेमटाकळी, श्री चोपडे कार्यकारी अभियंता, एस ए. साळुंके, उपविभागीय अधिकारी एम.के.तांबागडे,शाखा अभियंता आर.पी.राजगुरू, सहाय्यक अभियंता गौरव जुआर,शाखा अभियंता आकाश शिंदे सह कर्मचारी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button