बातमी

शिवसेना महीला आघाडीने जिल्हाकचेरी समोर केले कुणाल कामराला जोडे मारो आंदोलन…

शिवसेना महीला आघाडीने जिल्हाकचेरी समोर केले कुणाल कामराला जोडे मारो आंदोलन…

 

बुलढाणा प्रतिनिधी
सुपारीबाज कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असुन कामराच्या तैलचित्राला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारुन आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला.
कॉमेडीयन कुनाल कामरा याने विडंबनपर काव्य समाजमाध्यमांवर प्रसारीत केले त्या काव्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवाय यापुर्वीही त्याने पंतप्रधान यांच्यावरही विडंबन काव्य केले होते. विशीष्ट पक्षाकडुन सुपारी घेऊन आमच्या पक्षनेत्यांवर जाणुन बुजून विडंबन करण्याचा प्रयत्न केल्या जात असेल तर शिवसेना यापुढे असे प्रकार खपवुन घेणार नाही. त्याला जसेच्या-तसे उत्तर देण्यात येईल. या विडंबनकार कामरा विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ अटक करावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा याच्या तैलचित्राला जोडे मारुन आंदोलन करत निषेध नोंदविला. यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई म्हस्के, अंजना खुपराव, कविता गायकवाड, अनिता झंवर,राधाताई फाटे, लताताई चव्हाण, कुमोद पाटील, संगिता बढे, रुपाली मिरगे यांच्यासह महीला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button