राजकीय बातमी

शिवसेना सह संपर्कप्रमुखांची जबाबदारी प्रा. लहाने यांच्याकडे

शिवसेना सह संपर्कप्रमुखांची जबाबदारी प्रा. लहाने यांच्याकडे

बुलढाणा

जिल्हा परिषद ,पंचायत समित्या निवडणुका पुढ्यात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात महत्त्वाचे फेरबदल केले आहे. काही व्यक्तींवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या निर्धारित केल्या असून त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात भरिव कार्य करणारे प्रा. डी एस लहाने यांच्याकडे सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रा.डी एस लहाने यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील मानस फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी मोठे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. सहकारातही त्यांची आघाडी आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी शिवसाई ज्ञानपीठ च्या माध्यमातून नाव कमावले आहे. जिल्हा परिषद सदस्य राहून त्यांनी पूर्वीच आपला परिचय देखील दिला आहे.शिवसेनेत त्यांनी पक्ष संघटन बांधणीकडे विशेष लक्ष दिले. नुकताच बुलढाणा विधानसभेतील शंभर कार्यकर्त्यांचा त्यांनी मातोश्री वर पक्षामध्ये प्रवेश करून घेतला. 80 टक्के समाजकारण 20% राजकारण या शिवसेनेच्या व्याख्यात प्रा. लहाने तंतोतंत बसतात. या कार्याची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सह संपर्कप्रमुख पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,शिवसेना नेते विनायक राऊत, संपर्क प्रमुख नरूभाऊ खेडेकर ,जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत ,राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, आमदार सिद्धार्थ खरात व अन्य सहकारी मित्रांचे आभार मानले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button