बातमी

श्री संत सावता महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

मराठी संतकवी श्री संत सावता महाराज यांना जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराज शिक्षण, क्रीडा व ग्रामीण विकास बहू. संस्था नांद्राकोळी व नांद्राकोळी अर्बन च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी दलित मित्र माधव राव हुडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्तव्य कर्म करीत असताना काया वाचे मन ईश्वर भक्ती करता येते. त्यामुळे संपूर्ण आयुष्य संत सावता यांनी धार्मिक प्रबोधन व भक्ती प्रसारचे काम निष्ठेने व्रत म्हणून आचरीले. असे मत सर्वच मान्यवर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अनुश्री महिला. बहू. संस्था भुसावळ यांच्या वतीने भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 सतीश उबाळे यांना भुसावळ येथे प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्याची दखल म्हणजे हा पुरस्कार असल्याने,त्यानिमित्त सर्व मान्य वर यांच्या वतीने सतीश उबाळे यांचा सहहृदय सत्कार करण्यात आला.यावेळी उप सरपंच मनोज जाधव, समाधान जाधव, बाबुराव राऊत काका, कडुबा सोनुने, तंटामुक्ती उप अध्यक्ष अनिल राऊत,व्यवस्थापक गणेश गोरे, भारती गवळी, शुभांगी राऊत यांची उपस्थिती होती

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button