बातमी
संदीप शेळकेंनी केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कौटुंबिक सत्कार
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेला फेटा घालून दिल्या शुभेच्छा..

संदीप शेळकेंनी केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कौटुंबिक सत्कार
* महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेला फेटा घालून दिल्या शुभेच्छा..
बुलढाणा
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी त्यांचा महाराष्ट्राची संस्कृतीचे प्रतिक असलेला पारंपरिक फेटा घालून कौटुंबिक सत्कार केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा मान प्रथमच बुलढाण्याला मिळाला आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षश्रेष्ठीनी ही संधी दिली. ही बाब अभिमानाची असल्याचे सांगत संदीप शेळके यांनी सपकाळ यांची त्यांच्या घरी भेट घेतली. दोघेही महाविकास आघाडीचे असल्याने भेटीदरम्यान सामाजिक, राजकीय, पक्ष संघटन विषयावर चर्चा झाली. संदीप शेळके यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पेढा भरवून प्रदेशाध्यक्षपदी निवडीचा आनंद साजरा केला. यावेळी प्रा.मृणालिनी सपकाळ, शरद सपकाळ यांची उपस्थिती होती.
* बंटीदादा अन संदीपदादा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि उबाठाचे संदीप शेळके दोघांनाही प्रेमाने दादा म्हणतात. सपकाळ हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. तर संदीप शेळके सहकार आणि समाजकारणानंतर राजकारणात आले आहेत. दोन्ही नेत्यांचे चांगले ट्युनिंग आहे. विधानसभा निवडणुकीत दोघांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्यांच्यावर या निवडणुकीची मोठी जबाबदारी असणार आहे.



