बातमी

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करणाऱ्यावर ॲट्रासिटी ॲक्ट करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करणाऱ्यावर ॲट्रासिटी ॲक्ट करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

बुलडाणा जिल्ह्यातील तमाम बौद्ध अनुयांच्या वतीने मागणी
बुलडाणा,(प्रतिनिधी)- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश भूषण गवई यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हा निंदनीय आहे.या हल्ल्याचा आम्ही बुलडाणा जिल्ह्यातील सर्व बौध्द बांधवांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करतो. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संविधानावरील ; लोकशाहीवरील न्याय प्रिय प्रत्येक नागरिकावर हा हल्ला आहे.
हल्लेखोराने केलेला हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवून त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच सरन्यायाधीश हे दलित (बौध्द) समुदायातून पुढे आल्याने जातीवादाच्या पूर्वग्रहातून हल्लेखोराने हल्ल्याचा प्रयत्न केला असून त्या हल्लेखोरावर एट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी
अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातील तमाम बौध्द बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.
न्यायपालिका हा लोकशाहीचा प्राण आहे.
सरन्यायाधीशांवरील हल्ला हा
न्यायपालिकेवरील हल्ला हा लोकशाहीच्या प्राणावर केलेला हल्ला असून हा हल्ल्याचा प्रकार राष्ट्रद्रोह ठरविला पाहिजे.
चातुर्वर्णातून आलेला वर्णभेद जातीभेद महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून संपविला आहे.तरीही काही लोकांच्या मनातून जातीभेद; वर्णभेद; भेदभाव गेलेला नाही. त्याच जातीवादी भावनेतून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करण्याचा निंदनीय प्रयत्न झाला आहे. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संविधान लोकशाही आणि समता या संविधानिक मूल्यांवरील; न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे.गुन्हेगारांवर ॲट्रासिटी ॲक्ट व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी वेळीच कार्यवाही केली नाही तर भारत हा हुकूमशाही कडे वाटचाल करेल त्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी वेळीच पायबंद घालावा म्हणजे असे प्रकार होणार नाही. जर यावर योग्य कार्यवाही झाली नाही तर बुलडाणा जिल्ह्यातील तमाम बौध्द बांधव रस्त्यावर उतरतील व त्यांचे दुष्परिणाम शासनाला भोगावे लागतील याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन बुलडाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना देण्यात आले.
यावेळी समाजसेवक धम्मदाते भैयासाहेब पाटील, रिपाइं जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, रिपाइं फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष इंजिनियर विजय मोरे, दि बुध्दिष्ट सोसायटी ॲाफ इंडीयाचे राज्य सदस्य निरंजन जाधव, रिपाइं चे बुलडाणा तालुका अध्यक्ष केशवराव सरकटे, चिखली सामाजिक कार्यकर्ते सुनिल आराख, समाज सेवक ग्यरल, रिपाइं जिल्हामहासचिव विजय साबळे,रिपाइं विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे, माजी उपसभापती प.स. बुलडाणा तथा सरपंच देऊळघाट अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार, सेनि गटशिक्षणा अधिकारी पी.डी.महाले, रिपाइं युवानेते प्रशांत मिसाळकर, रिपाइं तालुखाध्यक्ष मोताळा बाळासाहेब आहिरे, संजय महाले चिखली, रिपाइं जिल्हाउपाध्यक्ष दिलीप काकडे, विदर्भ महीला उपाध्यक्ष आशाताई वानखडे, बुलडाणा महीला तालुकाध्यक्षा उषाताई इंगळे, अल्पसंख्याक आघाडी रिपाई जिल्हा प्रमुख मिर्झा बेग, रिपाइं कार्यध्यक्ष प्रा. पठाण सर, रमेश पिंपळे, विजय भालमोडे, प्रदिप मुख्यदल, भानुदास शेजोळ,शरद खरात, जिल्हा रिपाई उपाध्यक्ष पंकज वाघ, पत्रकार रविंद्र वाघ, सगवन ग्रामपंचायत सदस्य सुभाष मिसाळ, विजय भालेराव, मिडीया रिपाई प्रमुख चिखली विशाल गवई , सतीश गवारगुरू इत्यादी तमाम बुलडाणा जिल्ह्यातील बौध्द बांधव व आंबेडकरी विचारधारेचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button