सर्पमित्र प्रथमेश शिरसाट यांना वन्यजीव मित्रपुरस्काराने सन्मानित ..

बुलढाणा (प्रतिनिधी )
जागतिक मधमाशी दिवसा निमित्त बुलढाणा येथील ‘सर्पमित्र प्रथमेश सिरसाट’ यांना मुंबई येथे झालेल्या INDIAN NATURAL HONEY BEES संस्थे च्या वतीने वन्यजीव मित्र पुरस्कारने सन्मानित करण्यात आले .
20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई अंतर्गत सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (CBRTI), पुणे यांच्या वतीने मधमाशी संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई चे अध्यक्ष मनोज कुमार हे होते. यावेळी बुलढाणा येथील युवा सर्पमित्र प्रथमेश शिरसाट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वन्यजीव मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथमेश शिरसाट यांनी अनेक सापांना जीवदान देऊन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे. बुलढाणा शहर व इतर परिसरामध्ये साप निघाल्यानंतर लोक त्यांच्याशी संपर्क साधतात ते सापांना पकडून जंगलामध्ये सोडून देऊन त्यांना जीवनदान देतात.. ते करत असलेल्या कामाबद्दल हा वन्यजीव मित्र पुरस्कार त्यांना देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण 20 मे रोजी मुंबई येथे झाले….