बातमी
सहकार विद्या मंदिर बुलडाणाचा चि.पार्थ तायडे याचे शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरावर नेत्रदिपक यश

येथील सहकार विद्या मंदिर या सी.बी.एस.सी. मान्यता प्राप्त शाळेचा वर्ग 9 वी चा विद्यार्थी चि.पार्थ तायडे यानी सन 2023-24 मध्ये झालेल्या वर्ग 8 वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 80.53 गुण घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये 16 वा क्रमांक पटकावला आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमल सुकेश झंवर, प्राचार्य, मुख्यध्यापीका तसेच शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. पार्थने त्यांच्या यशाचे श्रेय अध्यक्षा सौ.कोमल झंवर, प्राचार्य, मुख्यध्यापीका व सर्व शिक्षक वृंद यांना दिले.



