साईराज व्हॅाली ईलीड संभाजी नगर कडून दिवाणी न्यायधिश पदी ॲड.अनिकेत जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

साईराज व्हॅाली ईलीड संभाजी नगर कडून दिवाणी न्यायधिश पदी ॲड.अनिकेत जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा (एमपीएससी) आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- २०२० जाहीर झाला. त्यात बुलडाणा येथील पत्रकार रिपाई आठवलेचे बुलडाणा जिल्हासंपर्क प्रमुख तथा साईराज ईलीड सोसायटीचे सभासद बाबासाहेब जाधव यांचे पुतणे ॲड. अनिकेत रंजना (मायादेवी) सुरेश जाधव यांनी महाराष्ट्र राज्यातून १०५ वा क्रमांक पहील्या प्रयत्नात व कोणतीही शिकवणी वर्ग नसतांना स्वत:ची मेहनत जिद्द व आभ्यासू वृत्ती या जोरावर त्यांनी ही दिवानी न्यायाधीशाची परिक्षा प्रथम प्रयत्नात पास वयाच्या २६ व्या वर्षी पास केली.
मेहनत व चिकाटी, अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. शिकवणी वर्ग लाऊनच एमपीएससी, युपीएससी परिक्षेत यश संपादन करता येते हा समाजात व विद्यार्थ्यांनमध्ये समज आहे तो ॲड. अनिकेत जाधव यांनी पुसून टाकला व मेहनत,जिद्द चिकाटी व अभ्यासू वृत्ती मुळे होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले.
यांची निवड झाल्याबद्दल छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) कांचनवाडी येथील साईराज व्हॅाली ईलीड या सोसायटी मध्ये ॲड.अनिकेतची निवड झाल्याबद्दल त्यांची आई मायादेवी जाधव व वडील सुरेशराव जाधव यांचा पुष्प गुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करून ॲड. अनिकेत यांना पूढील भावी जिवनासाठी शुभेच्छा देतांना पत्रकार बाबासाहेब जाधव, ईलेक्ट्रॅानिक इंजिनियर किरण दादा कुकलारे, छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधिकारी एपीआय अनिल भगवानराव कंकाळ,शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव यांनी केला यावेळी साईराज व्हॅाली ईलीड सोसायटीचे पदाधिकारी उपस्थीत होते.



