क्राईम बातमी

साखरखेर्डा येथे प्रेमीच्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

 

तालुक्यातील शेंदुर्जन या गावातील प्रेमियुगलाने साखरखेर्डा गावा नजिक असलेल्या सूतगिरणी परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल 22 डिसेंबर रोजी घडली. तर आज 23 डिसेंबर शनिवार रोजी प्रेमीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. यामुळे साखर खेर्डा, शेंदुर्जन परिसरसह सिंदखेडराजा तालुका तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या करणाऱ्या इसमाचे समाधान खिल्लारे ( ५५) असे नाव आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघडकीस आल्यावर साखर खेर्डा नगरीत व नंतर खिल्लारे यांचे मूळ गाव असलेल्या शेंदुर्जन गावात खळबळ उडाली. काल सूतगिरणी परिसरात आत्महत्या करणाऱ्या गोपाळ खिल्लारे याचे ते वडील होत. २२ वर्षीय गोपाळ खिल्लारे व तेरा वर्षीय साक्षी संतोष अंभोरे यांनी काल शुक्रवारी सोबत गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सामाजिक बदनामी व संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थली जाऊन पंचनामा केला असून शव उत्तरिय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button