बातमी

सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करा याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

दोषी आढळल्यास सोनोग्राफी सेंटर सील करण्याची केली मागणी...

सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करा याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

  • दोषी आढळल्यास सोनोग्राफी सेंटर सील करण्याची केली मागणी…

बुलढाणा ( आदर्श नेतृत्व )
सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करण्यात यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
भोकरदन येथील अवैध लिंगनिदान व अवैद्य गर्भपात केल्याचा प्रकार काही दिवसा अगोदरच उघडकीस आला होता यामध्ये बुलढाणा येथील डॉक्टर यांचा सहभागी असल्याचे उघड झालं होत.
काही सोनोग्राफी सेंटरवर चुकीचा पत्ता देऊन गर्भ तपासणी केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही
यासाठी जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करण्यात यावी व जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या आशयाचे जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते मोहन बाभुळकर यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button