बातमी

सोयाबिनला सात हजार रुपये भाव मिळवून देणारच  -आमदार सिद्धार्थ खरात यांचे कळंबेश्वर येथे प्रतिपादन

सोयाबिनला सात हजार रुपये भाव मिळवून देणारच
-आमदार सिद्धार्थ खरात यांचे कळंबेश्वर येथे प्रतिपादन
कळंबेश्वर,ता. ३: सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळवून देणार असे प्रतिपादन  मेहकर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. ते कळंबेश्वर येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात (ता.३)बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगडू भाकडे तर प्रमुख अतिथी म्हणून देऊळगाव माळी सर्कलचे जि.प. सदस्य संजय वडतकर, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील घनवट, शिवसेना उबाठा मेहकर शहरप्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुकाप्रमुख आकाश घोडे आदी उपस्थित होते.यावेळी मंचावर रमेश निकम, दत्ताभाऊ सोनवणे, विजय शेळके, बाबुराव गवई, भास्कर अंभोरे, भीमराव अंभोरे, योगेश कंकाळ, विजय लोखंडे, विलास काळे, ज्ञानेश्वर नागरिक, संजय मवाळ, दत्ता मोतेकर आदी उपस्थित होते.यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, की शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत.  त्यांनी मेहनतीने पिकविलेल्या मालाला योग्य भाव नाही. सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळावा, यासाठी विधानसभेत आवाज उठविणार आहे. सोयाबिनला जोपर्यंत सात हजार रुपये भाव मिळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.यावेळी जि.प. सदस्य संजय वडतकर यांनीदेखिल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन सतिश निकम युवा सेना विभाग प्रमुख देःमाळी सर्कल, संतोष भाकडे उपविभाग प्रमुख दे.माळी सर्कल,
 बाळू चांगाडे, संदीप भाकडे ऋषी भाकडे,  अजित अंभोरे, अमोल निकम,महावीर अंभोरे, हनुमान म्हळसने, आशिष मगर समाधान निकम,भक्तप्रल्हाद अंभोरे यांनी केले.प्रास्ताविक व  सूत्रसंचालन सतिश निकम तर  आभार  संतोष भाकडे यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांचा प्रचंड उत्साह होता.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button