क्रीडा बातमी

सौ. डॉ नंदा चाटे यांनी सुर्यनमस्कार स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक

सौ. डॉ नंदा चाटे यांनी सुर्यनमस्कार स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक

सौ. डॉ नंदा चाटे यांनी सुर्यनमस्कार स्पर्धेत पटकवले सुवर्ण पदक
बुलडाणा : 
     अंबड येथे छत्रपती योग क्रिडा प्रशिक्षण केंद्रातर्फे राज्यस्तरीय सुर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा १९ जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये बुलडाणा येथील खेळाडू डॉ. नंदा चाटे मॅडम यांनी ४ ते ५ तास चालणारी स्पर्धा अंतिम फेरी पूर्ण करून सुवर्ण पदक पटकवले. यावेळी अंबड तालुक्यातील मान्यवरानी शाम जोशी, देवानंद चित्राल, उदय कहाळेकद, डॉ. विवेक चर्जन, डॉ. मनीषा चर्जन, रफिक जमादार, सुरेश मिरकर, अॅड. किरण कुलकर्णी या मान्यवरानी विजयी डॉ. नंदा चाटे यांना पदक देऊन त्यांचे अभिनंदन केले.
 
      डॉ. सौ. नंदा चाटे या जाफ्राबाद तालुक्यातील मोहोरा आरोग्य केंद्र, तसेच भोकरदन तालुक्यातील धावडा, तर आरोग्य केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत प्रशिक्षण देतात. त्यांच्या कामगिरीचा जाफ्राबाद तालुक्यातीला अभिमान आहे. आपल्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन त्या योगाचा प्रचार प्रसार करत आहे. सौ. डॉ. चाटे मॅडम यांनी त्यांचा भाषणातून लोकांना सुर्यनमस्कार सर्वांग व्यायाम आहे, हा संदेश दिला. योगासने करायला वेळ मिळत नसणाऱ्यांनी किमान १० ते १५ सुर्यनमस्कार तरी करावेत. या योगाने वात, पित्त, कप, व नाडी हे संतुलीत राहतात.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button