बातमी

होऊ घातलेल्या बचत गट प्रदर्शनीचे बॅनर फाडले.. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..

होऊ घातलेल्या बचत गट प्रदर्शनीचे बॅनर फाडले..
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली..

 

बुलढाणा जिल्ह्यात मागील दशकांपासून दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्री शेळके यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरण व महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी दिशा महिला बचत गट फेडरेशन सातत्याने काम करत आहे
बुलढाणा शहरात 4,5 व 6 ऑक्टोबर रोजी बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बचत गट फेडरेशनच्या प्रदर्शनीसाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातून महिला बचत गट आपले स्टॉल लावण्यासाठी आयोजकांकडे मागणी करत आहे परंतु जिल्ह्यातीलच मोठ्या प्रमाणात बचत गटांची बुकिंग झाली असल्याने ही बचत गट प्रदर्शनी मोठ्या स्वरूपात होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शहरा धाड नाका संगम चौक येथे लावण्यात आलेले बचत गट प्रदर्शनी च्या प्रसिद्धीचे बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर जयश्री शेळके यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली आहे ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे
विकृत मानसिकतेच्या लोकांना हे पहावत नाही ते कामात खोडा आणण्याचा हा प्रकार आहे किती विरोध झाला तरी कार्यक्रम होईलच.!

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button