बातमी

ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज यांचे संदीप शेळके यांनी घेतले आशीर्वाद

 

 

जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री. संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवास (सखारामपूर ईलोरा ता. जळगाव जामोद) आज  शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे बुलडाणा जिल्हा समन्वयक, वन बुलडाणा मिशनचे संकल्पक मा.संदीपदादा शेळके यांनी ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेतले. सेवाकार्यात सहभाग घेत प्रसादाचे वाटप केले तसेच भाविकांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. पावली व फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
सखाराम महाराज संस्थानच्यावतीने २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशा भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. आज या यात्रेला दादांनी भेट दिली तसेच मराठा वधू-वर सोयरीक स्टॉललाही भेट देऊन आयोजकांसोबत चर्चा केली.
यावेळी  सरपंच सुहास वाघ, उपसरपंच वासुदेव पाटील, गोपाल बोरोकार, रामेश्वर वायजोडे, शरद अवचार, वैभव मोरखडे वैभव अढाव, श्याम वायझोडे, गजानन वायझोडे, विक्रम अकोटकर व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button