बातमी

14 वर्षीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश…

नवव्या वर्गात शिकणाऱ्या प्रज्वलने लिहिले VICTORY'S HIDDEN DEFEAT पुस्तक...

14 वर्षीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश…

नवव्या वर्गात शिकणाऱ्या प्रज्वलने लिहिले VICTORY’S HIDDEN DEFEAT पुस्तक…

बुलढाण्यात नवव्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल पाटील याने स्वतःचे पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आणि या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकार आयोजित, एक फेब्रुवारीपासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे…

चिखली शहरात राहणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची सवय असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ, कादंबऱ्या, ऐतिहासिक आणि इतर पुस्तकांचे वाचन केले, त्यानंतर त्याला लिहिण्याचीही आवड निर्माण झाली आणि त्याने “VICTORY’S HIDDEN DEFEAT” अर्थात “विजयात दडलेला पराभव” हे पुस्तक लिहून प्रकाशित केले, 1 फेब्रुवारीपासून भारत मंडपम् दिली येथे भारत सरकार द्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वल च्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे…
आपल्या मुलाने अभ्यास करावा चांगले गुण मिळावे यासाठी अनेक पालक आपल्या मुलांकडे आग्रह धरतात, तर दुसरीकडे अनेक मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, असे असताना आपल्या मुलाने एवढ्या कमी वयात पुस्तक लिहावं आणि त्याचे पहिलेच पुस्तक जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये समावेशित व्हावं यामुळे प्रज्वलच्या आई-वडिलांनाही मोठं अभिमान आणि कौतुक वाटतय…सोशल मीडिया आणि रिल्स च्या जमान्यात पुस्तक वाचनाची सवय कमी झाली, मात्र प्रज्वलने कमी वयात वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे..

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button