देशी कट्टयाची खरेदी-विक्री करतांना ; 4 अटक ; 4 फरार
* गोंडाळा डॅम परिसरातील घटना
जळगाव जामोद
देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणाऱ्या 4 आरोपींना बुलढाणा एलसीबीच्या पथकाने 24 नोव्हेंबर 2023 रोजी रंगेहाथ अटक केली़. यावेळी 4 आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. यावेळी आरोपींच्या ताब्यातून देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर असा १४ लाख ३ हजार रुपयांचा एैवज जप्त केला़.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील मध्यस्थाच्या मार्फत पुणे येथील दोघे जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गंत गोंडाळा डॅम येथे देशी कट्टा खरेदीसाठी आले होते. याविषयी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्याचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच छापा टाकला़. यावेळी मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक रा. वाशिम बायपास अकोला, फहदखान फारुखखान रा. भवानीपेठ पुणे, तौसिफ करीमखान रा. रविवारपेठ पुणे, रामसिंग भवानसिंग मुझाल्दा रा. निमखेडी ता. जळगाव जामोद यांना अटक केली. तसेच इतर 4 घटनास्थळावरून पसार झाले.
यावेळी पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातून एक देशी कट्टा किंमत ३० हजार, ७ जिवंत काडतूस किंमत ३ हजार ५०० रुपये, कार किंमत १२ लाख व इतर साहित्य असा १४ लाख ३ हजार ५०० रुपयांचा एवज जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.