*बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण*
- बुलडाणा, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे कुक्कट पालन व पशुपालनात शेळी, गाई आणि म्हशीपालनाच्या प्रशिक्षणाचे आयोजन दि 6 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग सुरू करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्यामुळे या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कट आणि गाई, म्हशी पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरू करण्यासाछर संपूर्ण सहकार्य त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच शासकीय योजनांची माहिती या कालावधीत देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवार हा किमान 5वी उत्तीर्ण असावा. तो 18 ते 50 वर्षादरम्यान असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र दिले जाईल, तरी प्रशिक्षण नोंदणीसाठी 6 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, मो. न. 8275093201, 9011578854 संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.
*****