महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या १४ विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून लाखो लोक येत असतात. या दिवशी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर २०२३ रोजी आहे. या दिवसासाठी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईदरम्यान ३ विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूरदरम्यान ६ विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. कर्नाटकातील कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान दोन विशेष चालवण्यात येतील. सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान दोन विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तसेच नागपुरातील अजनी स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान १ विशेष ट्रेन चालविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. या गाड्यांना नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर अशी थांबे आहेत.
———————-

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *