बंजारा समाजाच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : आमदार संजय गायकवाड* राजूर येथे आमदार संजय गायकवाड यांचा बंजारा समाजाच्या वतीने सत्कार
आज पर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात भरपूर आमदार होवून गेले . परंतु धर्मवीर संजय गायकवाड यांच्या सारखा आमदार होणे नाही. कारण की ते आमदार म्हणून वागत नाही ते एकदम साधे सिंपल सर्वसामान्य जनतेत मिसळून राहतात. 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी रामेश्वर मंदिर राजूर येथे बंजारा समाज बांधाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात घाटाखालील बंजारा बहुल भागातील नायक कारभारी सरपंच, माजी सरपंच, माजी सभापती यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, बंजारा समाजाबद्दल आपुलकी आणि घरगुती संबंध असल्याचे सांगत बंजारा समाज हा फार मेहनती असून तो आजही काबाड कष्ट करून जीवन जगत आहे. बुलढाणा शहरापासून जवळ असलेल्या खडकी, मोहेगाव, नाईक नगर या परिसरातील मजूर वर्ग किती मेहनत करतो हे मी जवळून पाहिले आहे. वसंतराव नाईक साहेबांच्या मेहरबानीने आज रोजी आपण प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मोठमोठ्या पदावर अधिकारी पाहत आहोत, ही नाईक साहेबांची देन आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले बंजारा समाजाच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपण मला केंव्हाही आपल्या समस्या सोडविण्यासाठी भेटू शकता, आपल्यासाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे 24 तास उघडे आहे. बंजारा समाजानी मला खूप काही दिले आहे .लहान पनापासून माझी बंजारा समाज बांधव सोबत नाळ जोडलेली आहे. यावेळी गोत मारा , कुऱ्हा, हनवतखेड, नलकुंड, नाईक नगर, गुळभेली, रायरा, खमखेड, खडकी, मोहेगावं, खिरखेड, तरोडा, तारापूर,निमखेडी, रामगाव तांडा, गिरोली या गावातील सरपंच नायक कारभारी यांच्या हस्ते आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांची उपस्थिती होती.
* आता पर्यंत जे आमदार झाले त्यांनी बंजारा समाजाचा फक्त वापर करून घेतला. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न न करता त्यांना विकासापासून कोसोदूर ठेवले आहे. परंतु आमदार धर्मवीर संजय गायकवाड हे निवडून आल्या पासून त्यांनी बंजारा बहुल भागातील तांड्याकडे विशेष लक्ष देवून त्यांचा विकास कसा होईल, याचा विडा उचलला आहे. त्यांनी आतापर्यंत तांड्यात मंगल कार्यालय, सभामंडप, व्यायाम शाळा, वाचनालय, स्मशानभूमी रस्ते अशी भरपूर कामे करून तांड्यांचा दर्जा कसा उंचावेल याकडे खास विशेष लक्ष दिले आहे.
बुलढाणा शहरात जवळपास 300 ते 400 घरे बंजारा समाज बांधवांची असून त्यांच्यासाठी 50 लक्ष रुपयांचे मंगल कार्यालय तसेच वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा सौंदर्यकरण अशी भरपूर कामे त्यांनी केलेली आहे.