- विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले बुलढाणा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी….सीडनेटला विमा संरक्षण नाही हे दुर्दैवी.. येणा-या अधिवेशनात प्रश्न मांडणार…दानवे*
-
शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे दिली
बुलढाणा जिल्ह्या मध्ये
26 ,27 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे हरभरा कापूस गहू तूर या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा, लोणार, देऊळगाव राजा या भागामध्ये गारांचा पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या (सिडनेट) शेडनेट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सिड नेटचे प्लॉट जमीन दोस्त झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचा नुकसान झालं आहे तर सीड कंपन्यांनी सुद्धा हात वर केल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 29 नोव्हेंबरला केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा विरोधी पक्ष नेत्यांसमोर मांडल्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले या शेतकऱ्यांच्या भरोशावर सीड कंपन्या मोठ्या होतात परंतु त्यांना नुकसानीच्या काळात मदत करत नाही यासंदर्भात ही अधिवेशनामध्ये सरकारला प्रश्न विचारला असल्यास त्यांनी सांगितलं..