संविधानामुळे देश एकसंघ राहिला– सुनील सपकाळ
संविधानाने ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ म्हणायला शिकवीले. आम्ही भारतीय लोक अशी सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता ,स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही मुलतत्वे दिली. संविधाना आहे म्हणून देश एकसंघ राहिला आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ यांनी आज केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कार्यालयात संविधान दिन, सव्वीस अकराचे हल्ल्यात
शहीद झालेल्या शहिदांना अभिवादन तसेच ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्रास वैचारिक दिशा देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले होते तर कार्यक्रमात बबन नाना शेळके, दिनकरराव चिंचोले, निवृत्त नेत्र तज्ञा डॉक्टर सौ काळे, पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे, गणेश निकम केळवदकर, दीपक मोरे, अमोल रिंढे, प्राध्यापक अमोल वानखेडे पाटील,शैलेश खेडकर,प्रा. विजय घ्याळ, लक्ष्मण ठाकरे आदी उपस्थित होते.