संविधान हा राष्ट्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरोघरी असावा…! प्राचार्य डॉ सीमा लिंगायत
भारताचे संविधान जगाच्या प्रेरणास्थानी – अँड. किरणताई राठोड-उमक
शासकीय अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्सावात साजरा.
आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर या कार्यक्रमाच्या आद्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सीमा सुरेश लिंगायत होत्या.प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून बुलढाणा शहरातील प्रसिद्ध विधी तज्ञ अँड. किरणताई राठोड-उमक या होत्या.
प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ,संत गाडगेबाबा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.संविधान प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा सेवा अंतर्गत बि. एड प्रशिक्षणार्थी द्वितीय वर्ष यांनी आयोजित केला होता.या वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना अँड. किरणताई राठोड-उमक म्हणाल्या की.भारताचे संविधान हे जगाच्या प्रेरणास्थानी असून भारतातील सर्व नागरिकांनी संविधान जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.प्रशिक्षणार्थी यांनी ज्ञानार्जन करून राष्ट्र विकासासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकानी संविधानातील मूलभूत अधिकारी ची माहिती असणे व त्यातील राष्ट्रीय कर्त्यव्या विषयी जागृत राहणे आवश्यक आहे.
या वेळी कार्यक्रमाचे अद्यक्ष शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सीमा सुरेश लिंगायत म्हणाल्या की.संपूर्ण भारतात संविधान संस्कृती ची रजवणूक व संवर्धन करण्या करिता प्रत्येक भारतीयाने संविधान संस्कृती अंगिकरावी . भारतीय संविधान हा राष्ट्र ग्रंथ असून प्रत्येकाच्या घरोघरी संविधान ग्रंथ असायला हवा.
संविधान दिनाचे महत्व विशद करताना त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.आपल्या भारत देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.म्हणून प्रत्येकांनी संविधान विषयी परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अनिल वरघट ,प्रा.डॉ. हर्षानंद खोब्रागडे, ग्रँथपाल आर .गायकवाड (छत्रपती संभाजी नगर.) ,प्रा डॉ सुनील खडसे,प्रा.राहुल एस. हिवाळे ,प्रा भावना काळे,प्रा .प्रेरणा श्रीनाथ . ग्रँथपाल डोंगरदिवे आदी उपस्थित होते .
संविधान दिना निमित्य या आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बि. एड प्रशिक्षणार्थी कविता जाधव यांनी सुत्रसंचालन केले.प्रास्ताविक राजू फासे यांनी केले.या वेळी रवींद्र देवरे, मो.फैजल अन्सारी,किसन देशमुख यांनी भाषण केले तर आभार प्रदर्शन डी. राजपूत यांनी केले.
सदर या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचे सेवांतर्गत बि. एड प्रशिक्षणार्थी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत शासकीय अध्यापक महाविद्यालयचे नियमित बि.एड प्रशिक्षणार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.