सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे बाहेरचे परिक्षा केंद्रे दिल्यामुळे आर्थिक व मानसिक खच्चीकरण थांबवा

*सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे बाहेरचे परिक्षा केंद्रे दिल्यामुळे आर्थिक व मानसिक खच्चीकरण थांबवा*

*सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघाची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*


राज्यामध्ये आज सुशिक्षत बेरोजगार यांच्याकडे शारीरीक, शैक्षणिक, व काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असतांना केवळ हाताला काम नाही म्हणुन बेराजगारीच्या तनावात आज बेरच युवक आहेत त्यातच राज्यसरकाने खाजगी कंपनीला नोकर भरतीचे टेंडर देवुन परिक्षेचे आवेदन फी ही एक हजार रुपये केली मजबुरी चा फायदा सरकार घेत आहे. मुलांना कोणताही इनकम सोर्स नाही तसेच ते हाताला मिळेल त्या अल्पमानधनावर काम करीत राज्यातील युवक आज प्रदिर्घ कालावधी नंतर निघालेल्या आवेदन फॉर्म भरत सरकार नोकर भरती साठी आवेदन फॉर्मचे 1000 रुपये चालान भरत आहे. म्हणुन खाजगी कंपनी यांनी आवेदन फॉर्म मध्ये विद्यार्थ्याला सोयीचे ठरेल असे तिन पंसतीचे ठिकान त्यामध्ये द्यावे असा कॉलम टाकला मुलांनी ही वाटले या पैकी एक सेंटर मिळेल पण अनेक मुलांना बुलडाण्यातील मुलांना धुळे जळगाव सारखे सेंटर मिळाले आहे. सकाळच्या शिप्टची ठेवण्यात आली बरेच ठिकाने हे मुख्यालया पासुन आड रस्त्यावर असल्याने नक्कीच मुलांची ॲटोचा व प्रवासाचा खर्च शिवाय राहण्याचा खर्च यांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसनार आहे शिवाय महिलांना पाठवायचे म्हटल्यावर अनेक महिलांचे छोटे छोटे बाळ असल्यामुळे त्यांना संभाळण्यासाठी सोबत परिवारातील एकाजनाला न्यावे लागनार आहे.
अश्या मागणिचे निवेदन घेवुन आज दिंनाक 29 नोव्हेंबर 2023 रोजी सुशिक्षीत बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविनारे समाजरत्न पुरस्कार प्राप्त तथा सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे याच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी ने आज बुलडाणा निवासी जिल्हाधिकारी थोरात साहेब यांच्या सोबत चर्चा कुरुन मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे निवेदनामध्ये नमुद आहे की विद्यार्थ्यांना कुठलाही इनकम सोर्स नसल्याने तसेच ते सर्व शैक्षणीक पात्रता धारण करत असताना केवळ बेरोजगारांचा सावट म्हणुन हुकुमशाही पध्दतीने फी आकारली जात आहे आणि तरी सुध्दा राज्यातील बेराजगारांनी 1000 रुपये फी भरली व शासनाच्या तिजोरीत भर पाडली.
आमचे सरकारला विनंती आहे की, आवेदन फॉम मध्ये जे सेंटर जवळचे आहे ते नमूद केले आहे. मुलानी मूळ जिल्हयासह जवळिल तिन जिल्हे टाकले असतांना सुध्दा त्या विद्यार्थ्याच्या विभागातला सोडुन इतर विभागातला जिल्हा का दिला आहे.
उदा. बुलडणा जिह़यामधील महिला विद्यार्थी यांना धुळे सेंटर मिळाले आहे.या त्या ठिकाणी पोहचण्याची वेळ 10:00 च्या आत असल्याने त्यांनी दिलेल्या वेळेच्या आत पोहचण्यासाठी रात्री मुक्कामी जावे लागेल तिथे अनोळखी ठिकान असल्याने राहण्याची व्यावस्था भाडयाचा खर्च अनेक युवती महिला हया छोटे छोटे लेकर असल्याने त्याना सोबती साठी एक घरातील माणूस न्यावा लागनार असल्याने आर्थीक व मानसिक खच्चीकरन होत आहे.
तरी आपणास विनंती आहे की वरील मुद़दयाचा विचार करुन उमेदवाराने पसंती दिलेल्या सेंटर पैकी एक सेंटर देवुन बेरोजगाराची मानसीक व आर्थिक खच्चीकरन थांबवावे ही विनंती.
अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर प्रभाकर वाघमारे, अभय जग्गंम ,परमेश्वर बहुरुपे, शितल गवई, दिलीप गवई, अंजली जाधव, वैशाली जाधव, अनुराधा तुपकर, भवानीप्रसाद सोळंकी, संतीश मुंडे,सुशिल उबाळे, गजानन पडोळे , पुजा जेऊघाले,राज गवळी, विशाल पवार , सह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *