सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये याकरिता समता संघटनेच्या वतीने उपोषण सुरू…

भूमिहीनांनी शेतीसाठी काढलेल्या अतिक्रमित गायरान जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये याकरिता समता संघटनेच्या वतीने उपोषण सुरू…

 

समता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिहीनांनी शेतीसाठी अतिक्रमित केलेल्या व ताब्यात असलेल्या गायरान जमिनीवर शासनाचा होऊ घातलेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प होऊ नये याकरिता अमरण उपोषण सुरू केले आहे.

भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त अन्य मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी बऱ्याच कालावधीपासून गायरान जमिनीवर उपजीविकेसाठी शेतीसाठी अतिक्रमण केले आहे व सदरचे अतिक्रमण नियमाकोल करून कायम पट्टे मिळावेत ह्या करिता सदरचे अतिक्रमण धारक वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करत आहेत असे असताना शासनाने नुकत्याच गायरानावर सुद्धा सौर कृषी वाहिनी प्रकल्प घ्यावा असे निर्देश दिले आहेत व त्यामुळे स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी यांनी कोणतेही पंचनामे न करता सदर वही ती असलेल्या जमिनी पडीत दाखवून तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे भूमिनांचे सदर शेती हेच एकमेव साधन असून त्यांच्या ताब्यातील जमिनीवर हा प्रकल्प घेतल्यास सदर लोकांवर उपासमारीची वेळ येईल त्यामुळे सदरचा प्रकल्प हा पडीक जमिनीवर घ्यावा व यापूर्वी झालेल्या आदेशाचे पुनराविलोकन करावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे

 

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *