बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावातील अडीच वर्षीय चिमुकडीवर अत्याचार करणाऱ्या नरधामाला भर चौकात फाशी देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. 28 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर लहान लहान मुलींवर बलात्कार अत्याचार होत आहे त्यांना न्याय मिळत नाही बलात्कार आणि अत्याचार महिलांवर दिवसां दिवस चालू आहे अशा नरधामाला कठोर कारवाई होत नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नरधामाला पाठीशी पोलीस प्रशासन घालत आहे व त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांच्यावर कोणीही कारवाई होवुशकत नाही म्हणून त्यांची ताकद आज वाढलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊनही सुद्धा महाराष्ट्र शासन कोणतीच कारवाई करत नाही महिलांना मान सन्मान देण्याचे काम महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार मोठमोठ्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून करत आहे पण बुलडाणा जिल्ह्यातील महिलांवर आणि लहान लहान मुलींवर, शाळेतील मुलींवर बलात्कार अत्याचार झाला की एकही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलत नाही पिढीतांना न्याय देत नाही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पीडितांना न्याय देण्यासाठी कधीही धावून येत नाही अशी परिस्थिती या बुलढाणा जिल्ह्यातील महिलांवर झाली आहे महिलांना न्याय मिळत नाही आणि बोराखेडी प्रकरणातील त्या नरधामाला तात्काळ भर चौकात फाशी देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर फाशी दो आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हा साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, सागर पवार, गोलू श्री सागर पदाधिकारी उपस्थित होते.