संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात ३० नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा तहसीलवर जनआंदोलन 

मातृतीर्थात गुंजणार वन बुलढाणा मिशनचा आवाज

* संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात ३० नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा तहसीलवर जनआंदोलन
* नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे वेधणार लक्ष
सिंदखेड राजा 
    अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी वन बुलढाणा मिशनच्यावतीने सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयावर जनआंदोलन करण्यात येणार आहे. संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात मातृतीर्थ नगरीत वन बुलढाणा मिशनचा आवाज गुंजणार आहे. 
 
      अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वन बुलढाणा मिशनने जनआंदोलन उभारले आहे. सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊ राजवाडा ते तहसील कार्यालय रॅली काढण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायतीसाठी एकरी ५० हजार, कोरडवाहूसाठी एकरी २५ हजार तत्काळ मदत द्या, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका, अवकाळीचे तत्काळ पंचनामे करा, सोलर पॅनल नुकसानीसाठी प्रत्येकी रुपये १ लाख अतिरिक्त मदत द्या, शेडनेट नुकसानीचा एनडीआरएफमध्ये समावेश झालाच पाहिजे, प्रत्येक शेडनेट नुकसानग्रस्त शेतकऱ्याला १ लाख रुपये द्या आदी मागण्यांसाठी हे जनआंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *