वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्त्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित.
पुणे, दि. १ – वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्त्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित करण्यासाठी आज
पुणे येथील वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्यच्या वतीने आज दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी जनसागर हॉल ,सोमवर पेठ, पुणे या ठिकाणी संपन्न झाली.एक नवा पायंडा पाडण्यासाठी युवा आघाडीचे वतीने पुणे ते भीमा कोरेगाव रात्री भव्य अभिवादन बाईक रॅली नियोजन करायचे नियोजन करण्यात आला.रात्री १२ वाजून १ मिनिटांनी अभिवादन केले जाणार आहे.किमान पाच हजार युवक सहभागी करण्याचे नियोजन ह्यावेळी करण्यात आले. राज्यभर आणि विशेषत पुणे पिंपरी चे लगतचे जिल्ह्यात बैठक घेवून त्याचा आराखडा तयार करण्याचं आणि त्याची जबाबदारी, बैठकीच्या नियोजन देणे, सोशल मिडिया campaign करण्याचे ठरविण्यात आले.अभिवादन बाईक रॅलीच्या समोर विजय स्तंभ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा छोटा पुतळा असलेला देखावा असेल.नियोजन साठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या साठी नियोजन आणि व्यवस्थापन समिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
अभिवादन बाईक रॅली मध्ये सहभागी होवू इच्छिणारे साठी एक गुगल फॉर्म सार्वजनिक केला जाणार आहे.
- ह्या बाबतीत आज आदरणीय नेते युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर, राज्य कार्यकारणी महासचिव राजेंद्र दादा पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश दादा नांगरे पाटील , राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल जी गवळी, अफरोज भाई मुल्ला, अक्षय जी बनसोडे यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.३१ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या पुणे स्टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भीमा कोरेगाव विजयस्तंभ भव्य बाईक रॅली संदर्भात ही प्रथम नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांनी उपस्थित युवा आघाडी मधील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले सूचना केल्या त्याचबरोबर संवाद साधला आणि रॅलीच्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस पुणे शहर पूर्व अध्यक्ष सोमनाथ पानगावे , पिंपरी चिंचवड शहर पश्चिम अध्यक्ष नितीन गवळी, पुणे शहर महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण, पिंपरी चिंचवड शहर महासचिव सुनील गवळी, पुणे शहर उपाध्यक्ष अजित वाघमारे, मनोज क्षीरसागर ,प्रमोद वनशिव, धम्मपाल बनसोडे, विशाल साळवे, अक्षय तायडे प्रा. श्रीकांत जगताप ,रोहन चौधरी, एड.गजानन चौधरी, एड.शिरीष पाटील ,गोपाल वाघमारे, सागर ढेंबरे रोहन वाकचौरे राहुल बनसोडे धनंजय इझगझ,भूषण गवळी ,संजय निर्मळ राहुल ठणांबिर. चैतन्य इंगळे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.