जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा…
जिल्हा ऑम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन आणि राज्य ॲथलेटिक्स संघटनेतर्फे 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 16 18 आणि 20 वयोगटातील ॲथलेटिक्स साठी ही स्पर्धा आहे या स्पर्धेतून बुलढाणा जिल्ह्याचा संघ निवडायचा आहे त्यामुळे खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे बुलढाणा येथे जिल्हा क्रीडा संकुल च्या मैदानावर ही जिल्हास्तरीय अजिंक्य निवड चाचणी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव गोपाल सिंग राजपूत प्रशिक्षक विजय वानखेडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंनी एफ आय यु आय डी आधार कार्ड जन्म दाखला व बोर्ड प्रमाणपत्र ही न चुकता आणावे अन्यथा संबंधित खेळाडूला स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.