डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाटीका विकास कामाचे भाई कैलास सुखधाने यांचे हस्ते भूमीपूजन.
मेहकर….
भारतरत्न डाॅ बाबा साहेब आंबेडकर वाटीकेच्या सूशोभिकरणासाठी मेहकर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजयजी रायमूलकर यांनी एक कोटी रूयंपयाचा भरघोष निधी मंजूर केला. त्या विकास कामाचे भूमीपूजन 17 नोहेंबर रोजी भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांचे शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला भदन्त महेंद्र महाबोधी यांनी ऊपस्थितांना ञिसरण पंचशिल दिले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौध्दमहासभेचे जिल्हाध्यक्ष न ल खंदारे हे होते.
तर प्रमूख अतिथी म्हणून अभिधम्म बूध्द विहार समीतीचे अध्यक्ष मा एस बी गवई, भीमशक्ती संघटनेचे विदर्भ सरचिटणीस किशोरदादा गवई, माजी सभापती सतीष ताजने,सुरेश सरकटे, गजानन शिरसाट सर, अरूण शेजूळ सर, पी सी पवार सर, रामेश्वर सरकटे सर, शाहीर संघपाल गवई राजा विदर्भाचा वेबसाईडचे संचालक संजय गवई, धम्मसेवक नारायन ईंगळे, अश्पाकभाई ठेकेदार, गौकर्णाआई मोरे, लक्ष्मीबाई मोरे,लिलाबाई कटारे, शोभाबाई वाघमारे, वच्छलाबाई मधूकरराव गवई. आदि अनेक महिला पूरूष बहूसंख्येने ऊपस्थित होते.
या वेळी डाॅ बाबासाहे आंबेडकर वाटीकेतील अशोका हाॅलचे, व ईतर सुशोभिकरनाच्या विकास कामाचे भूमीपूजन भाई कैलास सुखधाने यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वच ऊपस्थितांनी या विकास कामाचे भरभरून कौतूक केले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन भीमशक्तीचे किशोर दादा गवई यांनी तर आभार शाहीर संघपाल केशव गवई यांनी मानले.