भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मेहकर
येथील भाजप पदाधिकारी विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेत असताना तेथे दुसऱ्या गटाच्या काही जणांनी पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना ३ डिसेंबर २०२३ रोजी घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी २३ जणांविरुद्ध भादिवी च्या कलम १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रकाश गवई यांच्या कार्यालयात ३ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद सुरू होती.
यावेळी विकासकामांची माहिती ते देत असताना दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी तेथे प्रवेश करून हल्ला केला. यावेळी प्रकाश गवई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे, तालुकाध्यक्ष सारंग प्रकाश माळेकर यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश गवई यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी प्रल्हाद अण्णा लष्कर, शिव ठाकरे, प्रदीप इलग, चंद्रकांत अडेलकर, रोहित सोळंके, शुभम खंदारकर, गोपाल देशमुख, दीपक निकस, अक्षद दीक्षित, विलास लष्कर, सीताराम ठोकळ, चेतन भांडेकर, महावीर मंजुळकर, आकाश पिटकर, जयकांत शिखरे, रवी शिंदे, आकाश मोहिते, ओम पिटकर, गजू मुदळकर व सुमित शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे करीत आहेत.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *