शेगाव येथे आशा व गटप्रवर्तकांचा विदर्भस्तरीय विजय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न…….!

  • शेगाव येथे आशा व गटप्रवर्तकांचा विदर्भस्तरीय विजय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न…….!
    विदर्भातील हजारो आशा व गटप्रवर्तकांची उपस्थिती…..!

*सरकारची कामगार विरोधी धोरणे बदलविण्यासाठी कामगारांनी एकजूटीने संघर्ष करावा…..!*

 

देशांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काही महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे खाजगीकरण करून त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा न देता कंत्राटी कर्मचारी म्हणून अत्यंत अल्पशा मानधनावर अथवा मोबदल्यावर काम करून घेतल्या जात आहे. लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठलीच इतर सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे सामाजिक सुरक्षा नाही. हे सरकारचं कंत्राटी करण्याच धोरण बदलण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदावर काम करीत असलेल्या जिल्हा आशा समन्वयक व तालुका समन्वयक आणि आशा व गटप्रवर्तकांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखविली पाहिजे असे मत सी आय टी यु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष कॉ. डॉ.डी एल कराड यांनी ३ डिसेंबर 2023 रोजी शेगाव येथे आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या विदर्भ स्तरीय विजय मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या मेळाव्याचे उद्घाटन सिटूचे राज्य महासचिव एडवोकेट एम एच.शेख यांनी उद्घाटना भाषण करताना आशा व गटप्रवर्तकांनी 23 दिवसाच्या आपल्या बेमुदत संपातून एकजूट काय असते हे आपल्या मानधनात भरघोस वाढ करून इतर योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवून दिले. त्यांनी पुढे असेही म्हटले की आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून लवकरात लवकर वाढीव मानधनवाढीचा शासन निर्णय आढावा अन्यथा एक महिन्यानंतर आरोग्य मंत्र्यांच्या घरावर संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक धडक देतील असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.
यावेळी आशा गटप्रवर्तक संघटनेच्या राज्याध्यक्ष आनंदी अवघडे, महासचिव पुष्पा पाटील, सिटूचे राज्य कोषाध्यक्ष के आर रघु, किसानसभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. अनिल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याच्या प्रास्ताविकातून जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी मान्यवर पाहुण्यांचा परिचय आणि मेळाव्याची भूमिका मांडली. याप्रसंगी मंचकावर प्रा.रमेशचंद्र दहीवडे, चंद्रपूर सुभाष पांडे, अमरावती, अर्चना घोगरे वर्धा, राजन गावंडे, अकोला उषा मूरखे यवतमाळ, मंगल ठोंबरे औरंगाबाद, शिवाजी कुरे बीड, संगीता पाटील उज्वला पाटील, कोल्हापूर ,शीला ठाकूर नांदेड विनोद चंदनशिव बुलढाणा, कॉ.अण्णा सावंत जालना, प्रतिभा पाटील, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती वायाळ यांनी केले तर आभार सीमा उमाळे यांनी मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या जिल्हा सचिव सुरेखा पवार, उपाध्यक्ष रश्मीताई दुबे,मंदा मसाळ, ललिता बोदडे, जयश्री तायडे, रूपाली गावंडे, शोभा बगाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *