देऊळगाव मही: संत ज्ञानेश्वर निवास अपंग व मूकबधिर विद्यालय देवगाव मही येथे तीन डिसेंबर जागतिक दिव्य आणि विविध क्रीडा व जनजागृती करून साजरा करण्यात आला अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव सुनील आरमाळ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर हेलन केलर व संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव आरमाळ यांच्या प्रतिमा पूजनाने झाले त्यानंतर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये 25 मीटर पन्नास मीटर आणि शंभर मीटर धावणे लांब उडी गोळा फेक संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या यावेळी मुख्याध्यापक जनक यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व याबाबत माहिती दिली सुनील आरमाळ यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या कायदे याविषयी मार्गदर्शन केले संचालक वायाळ मॅडम यांनी दर आभार शेरे यांनी मांडले कार्यक्रम मुख्याध्यापक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली यशस्वीपणे पार पडले