केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती
नवी दिल्ली: 2019 ते 2021 या कालावधी देशभरात 35 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली सामाजिक भेदभावाला कंटाळून अनुसूचित जाती जमाती मधील किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री अभया नारायण स्वामी यांनी लोकसभेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीच्या आधारे ही माहिती दिली मात्र सामाजिक भेदभावामुळे अनुसूचित जाती जमातीच्या किती मुलांनी आत्महत्या केल्या याची माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की देशात 2019 मध्ये 10,335 2020 मध्ये 12,526 व 2023 मध्ये 13,089 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली सामाजिक भेदभाव संपविण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याने समुपदेशन केंद्र तसेच अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.