बुलढाणा भाजपने जाळला काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांचा पुतळा* वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पडसाद

बुलढाणा भाजपने जाळला काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांचा पुतळा* वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पडसाद

बुलडाणा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस पार्टीने वारंवार अवमान जनक वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. नुकतेच काँग्रेस नेते कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी विर सावरकर यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने तमाम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचेच पडसाद ८ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा शहरात दिसून आले. भाजपच्या वतीने लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात वसंतराव नाईक चौकात प्रियांक खरगे यांच्या पुतळ्याला चपला मारून पुतळा जाळण्यात आला व जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळीच गर्दी करून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्रियांक खरगे यांच्या पुतळ्याला चपला मारत त्यांचा चौकात पुतळा जाळण्यात आला. “मुर्दाबाद मुर्दाबाद प्रियांक खरगे मुर्दाबाद” “काँग्रेस पार्टी मुर्दाबाद” अश्या घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. “वीर सावरकर हे तमाम देशवासियांची अस्मिता असून त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची प्रियांक खरगे व काँग्रेसने माफी मागावी अन्यथा कर्नाटकात घुसून भाजपा कार्यकर्ते प्रियांक खरगे यांना धडा शिकवतील” असा आक्रमक इशारा भाजपा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी यावेळी दिला आहे. तसेच कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव प्रा.विश्राम पवार यांनीही तीव्र शब्दात प्रियांक खरगे यांचा समाचार घेतला.

या निषेध आंदोलनात भाजपा जेष्ठ नेते प्रदेश प्रतिनिधी दिपकदादा वारे, भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब पवार, मंदार बाहेकर, वैभव इंगळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सिंधुताई खेडेकर, महिला जिल्हा सरचिटणीस उषाताई पवार, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. अलकाताई पाठक, सौ. शोभाताई ढवळे, सौ. वैजंतीताई कस्तुरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *