बुलढाण्यात प्रा.डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून विधवा परिषदेचे आयोजन
शंभर वर्षा नंतर पहिल्यांदाच बुलढाण्यात विधवा महिला परिषद चे आयोजन
पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान आहे असे असताना महिलांवर चाली रिती, रूढी परंपरा ओझे लादल्या गेले आहे.
या चालीरीतींना शंभर वर्षा पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी तिलांजली दिली मात्र जग एकविसाव्या शतकात जगत असताना आजही महिलांना दुय्यम स्थानाची वागणूक आजही दिली जाते.
याला छेद देण्यासाठी समाजातीलच सुजाण नागरिकांनी समोर येणे गरजेचे आहे असे असताना या महिलांच्या समस्या ची जाणीव असणारे प्रा डी एस लहाने यांनी पुढाकार घेऊन विधवा महिला परिषदेचे आयोजन केले आहे.
सातत्याने अशाच सामाजिक जाणीव चे भान ठेवून या अगोदर लहाने सरांनी विधवा परिचय मेळावा देखील आयोजित केला होता यामध्ये यशस्वीरित्या सात विधवांचे पुनर्विवाह लावून देण्यात त्यांना यश आले आहे.
आता विधवा परिषदेच्या माध्यमातून महिलांना विधवा महिलांचे पुनर्विवाह ,आर्थिक सक्षमीकरण शासकीय योजना यासह त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणे तसेच रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याकरिता या विधवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील हे भूषवणार आहेत.
परिषद दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी शिवसाई ज्ञानपीठ तुलसी नगर बुलढाणा येथे होणार असून या कार्यक्रमास विधवा महिला त्यांच्या नातेवाईकांनी तसेच आई-वडील सासू-सासरे मुलं-मुली यांच्यासह नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे आयोजक प्रा डी एस लहाने यांनी केले आहे.