बुलडाणा, दि.22(जिमाका): डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व आत्मा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व कृषि महोत्सव ‘अग्रोटेक-2023’चे 27 ते 29 डिसेंबर, 2023 दरम्यान विद्यापीठ क्रीडांगण येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते (दि.27) बुधवारी सकाळी 10 वाजता होणार असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध कृषि निविष्ठांचे 300 दालने शेतकरी बंधू-भगिनींना माहिती देणार आहेत. तसेच तिन्ही दिवस विविध विषयावर चर्चासत्र आणि कृषि प्रबोधन कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.