रविंद्र लहाने यांची ‘स्वीय सहायक गट- ब राजपत्रित’वर पदोन्नती

बुलडाणा दि. 22 (जिमाका): जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत असलेले रविंद्र लहाने यांची उच्च श्रेणी लघुलेखक या पदावरून ‘स्वीय सहाय्यक – गट-ब –राजपत्रित’ पदावर सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती झाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून पदोन्नती झाल्याबद्दल रवींद्र लहाने यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यालयातील तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मित्रमंडळ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. लहाने यांची महसूल विभागात 30 वर्षे सेवा झाली असून, यापूर्वी त्यांनी सेवा कार्यकाळात सन 1994 ते 1998 या वर्षात अध्यक्ष, प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ, अमरावती प्रदेश यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तसेच सन 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन अन्न नागरी पुरवठा व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडेही स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आहे. त्यांचा कार्यालयीन कामकाजासोबतच सामाजिक क्षेत्रातील कामांमध्ये हिररीने सहभाग असतो.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *