भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षाभेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भुमिके संदर्भात निवेदन करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षातील १४२ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे. हा लोकशाही वरिल हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्त्वांची नग्नहत्या आहे.
लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या घटनेचा कडाडून निषेध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला या अनुषंगाने महाविकास आघाडी च्या वतीने मलकापूर येथील तहसील चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित डॉक्टर अरविंदजी कोलते, संतोष भाऊ रायपुरे, हरिशभाऊ रावळ , एँड.एस एस मोरे, वनिताताई गायकवाड, मंगलाताई पाटील, श्याम भाऊ राठी,राजेंद्र वाडेकर, अरुण अग्रवाल, गजानन ठोसर,राजूभाऊ पाटील,सोपान शेलकर,जावेद कुरेशी, दीपक चांभारे, अशोकराव सुरडकर,अनिल झोपे,रईस जमादार, जाकीर मेमन, अशोकराव सुरडकर, अनिल झोपे, जावेद कुरेशी, दीपक चांभारेपाटील, तुषार पाटील, पांडुरंग चोपडे, अनंत भास्कर चिकटे, अनिल कुमार अहुजा, हनुमान भगत, हमीद खान, आसिफ शेख, संजय जाधव, उमाकांत चौधरी, दिलीप गोळीवाले, महादेव पवार, प्रमोद दादा अवसरमोल, राजेश सिंग राजपूत, डॉ. अनिल खर्चे,पूजा ताई गायकवाड,संजीवनी अर्जुन गायकवाड, अशोक मराठे, विनय काळे, किसन पाटील,सुधीर पाचपांडे, ज्ञानदेव तायडे, ज्ञानदेव कोलते, युसुफ खानउस्मान खान, अनिल गांधी,राजु जवरे,गिरीश कोलते, तुषार बराटे, निवृत्ती तांबे,हरिदास गनबास,राजश्री निकम, मनोहर पाटील, वाजीद खान, शिरीष डोरले, घनश्याम पुरोहित, रुपेश बागडे, संजय वानखडे, प्रवीण क्षीरसागर, संभाजी शिर्के,, श्रावण वाघ, डी एस चव्हाण, सलीम कुरेशी, विलास कांडेलकर, प्रमोद पाटील, गजानन तायडे, साहेबराव पाटील, मयुर महाजन, भुषण सनिसे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते