तालुक्यातील हिंगणकाझी शिवारात १८ लाख ५७ हजार किमतीचा तब्बल एक क्विंटल ८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गहू, कपाशी, तूर लावलेल्या शेतात गांजाची ७३ झाडे लपवण्यात आली होती. ही कारवाई शुक्रवार पासून करण्यात आली असून आज 23 डिसेंबर च्या दुपार पर्यंत करण्यात आली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी सुभाष भागवत पाखरे (वय 33 वर्ष) रा.भालेगांव ता. मलकापुर याने हिंगणाकाझी शिवारातील गट नं. 52 मधील त्याने अतिक्रमीत केलेल्या गहु, कपाशी व तुर असलेल्या शेतामध्ये स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या 73 गांजाची झाडाची अंदाजे किंमती 18,57,700 रुपये लागवड केल्याचे चौकशी दरम्यान मिळून आले. यावरून आरोपी विरुध्द कलम 20 एन. डी. पी. एस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदिप काळे, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, हेड कॉन्स्टेबल सचिन दासर, रघुनाथ जाधव, रविकांत बावस्कर, गणेश सुर्यवंशी, निता मोरे , संदिप राखोडे, सुभाष सरकटे यांनी केली.