शासकीय महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सचिन वासेकर यांना ४८ हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी करण्यात आली.
या घटनेची माहिती अशी की, शासकीय जिल्हा महिला रूग्णालय येथे कंत्राटादी पध्दतीने कार्यरत असलेला तक्रारकर्त्याकडून जिल्हा महिला रूग्णालय येथे तीन महिन्याच्या कालावधीत बजावलेल्या कर्ताव्याची ६ लाख रूपये बिलाच्या मोबदल्यात ८ टक्के प्रमाणे ४८ हजार रूपये वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन वासेकर लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाकडे करण्यात आली होती. त्यानुसार २२ डिसेंबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आयोजित करण्यात आली असता डॉ. सचिन वासेकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी केली. २३ डिसेंबर रोजी पथकाच्या कारवाईत ४८ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पडकण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अमरावती परिक्षेत्र पोलिस अधिक्षक मारोती जगताप, अप्पर पोलिस अधिक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्याम भांगे, पोलिस हेडकॉस्टेबल विलास साखरे, प्रविण बैरागी, मो. रिजवान, राजु सिरसागर, पोलिस नाईक विनोद लोखंडे, जगदिश पवार, गौरव खत्री, शैलेश सोनुने, स्वाती वाणी, चालक आर्शद शेख यांनी या कारवाई सहभाग घेतला.