जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…

 

 

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालयीन ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्थापन करण्यात यावा याकरिता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे स्वतंत्र पूर्व काळात आदिवासी बांधवांची जी दयनीय अवस्था होती ती आज सुद्धा कायम आहे ते आजही हक्काचे घर पुरेसे आहार शिक्षण आरोग्य रोजगार ह्या मूलभूत अधिकारा पासून उपेक्षित आहेत अत्यंत हालकीचे जीवन ते जगत आहेत शासकीय योजना वस्त्या तांड्यांपर्यंत कधी पोहोचलीच नाही कधी कोणी तशी विचार नाही केली नाही शासनाच्या विविध योजना सुद्धा आतापर्यंत पोहोचल्या नाहीत यामुळे पिढी दर पिढीचे होत असलेले नुकसान भरून निघणार नाही या ज्वलंत समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी हक्काचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा मुख्यालय येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करावी जेणेकरून आदिवासींचे जीवनमान उंचावल्या जाईल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याचे कार्यालय अकोला नाशिक या ठिकाणी असल्याने तेथे जाणे परवडत नाही त्याकरिता बुलढाणा येथे मुख्यालय ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे .
हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर विजय मोरे सुनील मोरे लक्ष्मण मोरे गोपाल बर्डे रविकिरण मोरे आशिष खरात आतिश बिडकर वीरेंद्र बोर्डे गजानन ससाने उदय सुरडकर निशाताई पावडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *