भारत राष्ट्र समितीचे बुलढाणा जिल्हा समन्वयक भैय्यासाहेब पाटील यांचा विदर्भ राज्य आंदोलन समितीला पाठिंबा
आज दिनाक 27/12/2023 रोजी स्वतंत्र विदर्भ राज्य साठी आमरण उपोषण संविधान चौक नागपूर येथे सुरू असलेल्या भारत राष्ट्र समिती बुलडाणा च्या वतीने जिल्हा समन्वयक श्री भैयासाहेब पाटील, यांच्या नेतृत्वात पाठिंबाचे पत्र दिले .तसेच तेलंगणा राज्य स्वतंत्र झाल्यावर श्री चंद्रशेखर राव, मां.मुख्यमंत्री यांनी शेतकरी ,शेतमजुर,कामगार,महिला, अल्पसंख्यक, दलीत,आदिवासी,
अश्या सर्व वंचित वर्गासाठी विविध योजना साठी निधी ची तरतूद अर्थसंकल्पात करून प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी केली. शेतकरी वर्गास चोवीस तास मोफत वीज,पाणी,बियाणे साठी पार्टी एकरी दहा हजार रू अनुदान,शेतकरी विमा पाच लाख रु,सर्व शेतमाल हमीभाव द्वारे सरकारकडून खरेदी ,दलीत अल्पसंख्यक वर्गासाठी दहा लाख रु प्रत्येकी चे उद्योग उभारणीसाठी अनुदान अश्या 450 योजना द्वारे छोट्या राज्याचा विकास केल्या त्याच धर्तीवर आपल्या विदर्भ राज्य चा विकास होण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होण्यासाठी भारत राष्ट्र समिती या आंदोलनात सक्रिय असून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे त्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा समन्वयक भैयासाहेब पाटील यांनी केले आहे.
यावेळी रामराव शिंदे ,मेहकर तालुका अध्यक्ष श्री बळीराम राठोड,लोणार तालुका अध्यक्ष प्रकाश नागरे, युवा नेते कुंडलिक घोडके उपस्थित होते